---Advertisement---

Jalgaon News : जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन; वाचा कधी ?

---Advertisement---

जळगाव : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार मार्च महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 4 मार्च, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment