जामनेर : झारखंड येथील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या बेहिशबी मालमत्तेच्या विरोधात सोमवारी येथे भाजपतर्फे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निदर्शने करण्यात आली.
शहरातील राजमाता जिजाऊ चौकामधे या पुतळा दहन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा साधना महाजन,भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर, आतीष झाल्टे,सुहास पाटील,डॉ प्रशांत भोंडे, श्रीराम महाजन, रवींद्र झाल्टे,माजी नगरसेवीका कमलबाई महाजन, सुनीता बेनाडे,वैशाली चौधरी,पल्लवी सुर्यवंशी,शितल सोनवणे,मालती सुर्यवंशी,वैशाली इंगळे,माजी सरपंच शंकर मराठे,निलेश चव्हाण,दिपक तायडे,विशाल महाजन,किशोर नाईक,अक्षय जाधव,मनोज जंजाळ,सदाशिव शिंदे आदी अनेक पदाधिकारी -कार्यकर्ते,नागरीक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते .