---Advertisement---

Jalgaon News : ट्रॅक्टर पुरात वाहून गेला, जळगावातील लाईव्ह व्हिडिओ

---Advertisement---

जळगाव : गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातही संततधार पावसाने जोर धरला आहे. दरम्यान, गिरणा नदी पात्रातून अवैध वाळूचा उपसा करताना ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात वाहून गेला. शनिवार, २४ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जळगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. शनिवार, २४ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास नागझिरी शिवरातील गिरणा नदी पात्रातून अवैधपणे वाळू उपसा सुरू होता.

दरम्यान, मोहाडी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने गिरणा नदी पात्रात अचानक पुर आला. यावेळी सात ते आठ मजूर ट्रॅक्टरमध्ये वाळू टाकत होते. अशातच पाण्याची पातळी वाढल्याने मजूरांनी ट्रॅक्टर सोडून स्वत:चा बचाव केला.

मात्र, ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात वाहून गेला. शनिवार, २४ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment