Jalgaon News : डिंक व तीन मोटरसायकल जप्त; पाल येथे कारवाई

जळगाव : पाल येथील जंगलातून डिंक घेवून जाणाऱ्या आरोपीचा माल व मोटारसायकल जप्त  करण्यात आले. आज रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी, रावेर (प्रादेशिक) यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार, रावेर वनक्षेत्रातील पाल परिमंडळ मधील पाल राऊंड स्टाफ यांच्यासह क.नं ५६ मधून मांजर रस्ता गस्त करीत असताना तीन मोटरसायकल क्रमांक पुढील  hfDelux एम.पी १०ME९५१६, स्मार्ट हिरो Mp१०mq ४४९२,  हिरो होंडा Mp१०mg 3494 असे असून अवैध डिंक घेऊन जात असताना मिळून आले त्यात साधारण ११८ किलो सलाई डिंक व २० किलो धावडा डिंक जप्त केला.

सदर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन प्रसार झाला आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळून आले नाही तरी वन गुन्हा क्र. 0२/२०२४ दिनांक-१९ मार्च, २०२४ चा जारी केला. या डिंकाची नुकसानी किंमत सलाई ११८की.लो ×११० = १२९८० रू.धावडा २० की.लो × 200 =४००० रू इतकी आहे.

तसेच तीन मोटरसायकल ची किंमत ही बाजार भावा प्रमाणे १३३००० इतकी आहे एकूण सर्व मिळून नुकसानी किंमत १,४९,९८०/- इतकं आहे. सदर कार्यवाहीत अजय बावणे वनक्षेत्रपाल रावेर, डी.जी. रायसिंग वनपाल पाल, एम.एम तडवी वनरक्षक व कायम वनमजूर यांचा सहभाग होता.

सदर कार्यवाही वनसंरक्षक धुळे, ऋषिकेश रंजन , जमीर शेख उपवनसंरक्षक यावल, प्रथमेश हाडपे सहाय्यक वनसंरक्षक यावल यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वन गुन्ह्याबाबत पुढील तपास वनपाल पाल यांचे मार्फत सुरू आहे.