Jalgaon News : ढोल ताश्याच्या गजरात अयोध्या दर्शनासाठी दोन बसेस रवाना

चोपडा : राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातुन “अयोध्या दर्शन”दोन बसेस विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या उपस्थितीत १एप्रिल रोजी रवाना करण्यात आल्या.जळगाव जिल्हातुन प्रथमच चोपडा आगाराची ऐतिहासिक बस चहार्डी ते अयोध्या साठी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली व आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या अथक परिश्रमाने हिरवी झेंडा दाखवुन रवाना करण्यात आली होती.पुन्हा चोपडा आगारात दोन बसेस अयोध्या दर्शनासाठी बुकींग झाल्याने अयोध्या येथे श्रीराम लल्लाच्या दर्शनासाठी रवाना झाले.सदर बसेसची सजावट व पुजा करून महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थीनींच्या लेझीम पथकाने नृत्य सादर करुन सवाद्य मिरवणूक काढुन जय श्रीरामाच्या घोषणांनी रवाना झाल्या.यावेळी विभा. वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, सुरक्षा व दक्षता अधिकारी दीपक जाधव, विभागीय लेखा अधिकारी सांगळे, कामगार अधिकारी कमलेश भावसार विभागीय वाहतूक अधीक्षक किशोर महाजन, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी दीपक चित्ते, सहाय्यक यंत्र अभियंता निलेश चौधरी,निलेश बेंडकुळे, आगार प्रमुख महेंद्र पाटील,कार्यशाळा अधीक्षक चंदनकर, वाहतूक निरीक्षक नितीन सोनवणे, सागर सावंत,डीडी चावरे संजय सोनवणे,चंद्रभान रायसिंग, नरेश जोशी, संजू सैंदाणे, भैया न्हायदे, अतुल पाटील तसेच आगारातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.