---Advertisement---

Jalgaon News : तरुणाला मारहाण; फौजदाराविरुद्ध गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव : संशयावरून एका तरुणास मारहाण केल्याप्रकरणी पाचोरा येथील पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्याविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ व २४ नोहेंबर रोजी कॉलेज ग्राउंड व सिंधी कॉलनी परिसरात उल्हासनगर येथील प्रथम संदीप गायकवाड (१९) या तरुणास संशयावरून वल्टे यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली होती.

भांडण सोडविण्यास आलेले प्रथमचे मामा संदीप ब्राहाणे यांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात पीएसआय जितेंद्र वल्टे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment