---Advertisement---
पाचोरा : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु. भा. पाटील पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा हस्तकलेतून टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार केल्या, मातीच्या वस्तू , छान छान मुखवटे, पुष्पगुच्छ, घराचे तोरण, पृष्ठाच्या कलाकृती मंदिरे,शाळा, घर इत्यादी वस्तू तयार करून भव्य प्रदर्शन भरवण्यात आले.
प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक अशोक परदेशी यांनी केले.यावेळी जळगाव तरुण भारत चे प्रतिनिधी सुरेश तांबे,क्लर्क तुषार जळतकर, रुपाली मॅडम उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दुपार सत्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनीं यांचे अनमोल सहकार्य लाभले.