---Advertisement---

Jalgaon News: ‘तू माझ्या ओट्यावर का उभा आहे’ म्हणत केला चाकूने वार

---Advertisement---

अमळनेर :  येथील शिवाजीनगर शिरूड नाका भागात मंगळवारी रात्री साडे साडेआठ वाजता एक धक्कादायक घटना घडली घराच्या वादातून एकाने दुसऱ्याच्या गळ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.

सचिन सुधाकर वराडे हा रेशन दुकानशेजारील घराच्या ओट्यावर उभा असताना राजेंद्र ऊर्फ बापू प्रताप महाजन हा सचिनला तू माझ्या ओट्यावर का उभा आहे, असे विचारले.त्यावर सचिनने उत्तर दिले सचिनने हे आमचे पण घर आहे, असे सांगितल्याचा राग आल्याने राजेंद्रने त्याला शिवीगाळ व मारहाण करू लागला.या वादानंतर सचिन तेथून निघाल्यावर काही वेळाने राजेंद्रने मागून जाऊन गळ्यावर चाकूने वार केला.

गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विजय शिंदे व पोलिस कर्मचारी संजय पाटील यांनी भेट दिली. पोलिसांनी जखमींच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment