जळगाव : तृतीयपंथीयांच्या समस्या/लिंग संवेदना या विषयावर 26 फेब्रुवारी रोजी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे.
तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रार निवारण जिल्हास्तरीय समिती गठीत केली असून सहायक आयुक्त, समाज कल्याण विभागाकडून तृतीयपंथीयांना “NATIONAL PORATAL FOR TRANGENDER PERSONS” या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाईन ओळखपत्र देण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने समाजशास्र विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव व सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्ती व समाजकार्य विषयाच्या विद्यार्थ्यांकरिता सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी ठिक 11.00 वा. तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या व लिंग संवेदना या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन समाजशास्र विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव येथे करण्यात आले आहे.
या कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे. तसेच विविध योजनांच्या लाभासाठी आवश्यक उदा. आधार कार्ड, मतदान कार्ड , नावात बदल केला असेल तर शासनाचे गझेट व एफीडेव्हीट, बँक खाते बुक, जातीचा दाखला, PAN कार्ड, शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र इ. सादर करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी आपली नोंदणी करावी अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर समोर महाबळ, जळगाव येथे संपर्क करावा. असे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.