Jalgaon News : ‘त्या’ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली….

जळगाव : ग्रामपंचायतीत शासनाच्या निधीचा अपहार झाल्याची चौकशी करण्यासाठी यावल पंचायत समितीसमोर सावखेडासिम ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले. आज उपोषणाचा सातवा दिवस असल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान यातील दोन जणांना यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

यावल तालुक्यातील सावखेडासिम ग्रामपंचायतच्या झालेल्या लाखो रुपयांच्या अपहारप्रकरणी यावल पंचायत समितीच्या कार्यालयासमोर पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर सोपान पाटील व त्यांचे सहकारी रहेमान रमजान तडवी व सलीम मुसा तडवी हे आमरण उपोषणास बसलेले आहे.

आज उपोषणाचा सातवा दिवस असून तिघ उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. आज सकाळी १o वाजता यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी वैद्यकीय सुत्रांच्या सुचने वरून उपोषणार्थींच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याने तात्काळ त्यांना पोलीस प्रशासनाने उपोषणस्थळी रूग्णवाहीका आणुन उपोषणकर्ते सलीम मुसा तडवी व रहेमान रमजान तडवी यांनी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

उपोषणांच्या ठीकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आले आहे. दरम्यान उपोषणाच्या ठिकाणी पंचायत समिती प्रशासनाचा ग्रामस्थांच्या ढिसाळ कारभाराचा  निषेध व्यक्त करण्यात येत आहे.