जळगाव : येथील महावितरणच्या जळगाव विभागीय कार्यालयासमोर गुरुवार, ६ जुलै पासून कामगार महासंघाचे नियम बाह्य बदल्यांच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले. मात्र शनिवार या आंदोलन स्थळी आंदोलनकर्ते सुट्टीवर अन् पोलीस ड्युटीवर असल्याचे चित्र पहायला मिळाले.
कामगार महासंघाने बदली विषया संबंधी आंदोलन पुकारले असून सदरील आंदोलनास पोलीस विभागाने नियुक्त केलेला पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्यावर हजर होता. ज्यांनी महावितरण प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन छेडले ते मात्र उपस्थित नसल्याचे आढळून आले.