एरंडोल : येथील बस स्थानकात येणाऱ्या एका वृद्ध प्रवाशाला बाहेरगावी जाण्यासाठी निघालेल्या बसने ठोस दिली. यामध्ये मानसिंग पाटील (७३, रा. खडके खुर्द) हा वृद्ध प्रवासी गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणारा टँकर भराव पुलावरून खाली कोसळला. त्यानंतर लागोपाठ दुसऱ्या दिवशी ही दुसरी घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एरंडोल पोलीस स्टेशनला काही एक नोंद झालेली नव्हती.
मानसिंग पाटील हे एका रुग्ण नातेवाईकाला दवाखान्यात पाहण्यासाठी एरंडोल येथे आले होते ते काम आटवून घरी खडके खुर्द येथे जाण्यासाठी बस स्टॅन्ड मध्ये शिरत होते. त्यावेळी स्थानकातून बाहेर निघालेल्या एम एच २०/ ३९८३ क्रमांकाच्या बसने त्यांना ठोस दिली.