जळगाव : मणिपूर आणि एरंडोल-खडके घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी जळगावात आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील समस्त आदिवासी समुदाय व आदिवासी एकटा परिषदेच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी राजकीय नेत्यांसह आदिवासी महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मणिपूर आणि एरंडोल-खडके येथे घडलेल्या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी जळगावात आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील समस्त आदिवासी समुदाय व आदिवासी एकटा परिषदेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यामध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून आदिवासी महिलाही सहभागी झाल्या होत्या.
आक्रोश मोर्चात जिल्ह्यातील आदिवासी महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यासोबतच राजकीय नेत्यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि इतर संघटनांनी सहभाग नोंदवला.