महिला सक्षमीकरण योजना समर्थनार्थ मानवी साखळीला महिलांचा प्रतिसाद, महिला महानगर अध्यक्षा मिनल पाटील यांचे नियोजन

जळगाव : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी जळगाव भेटीत महिलांना शासकीय योजनांची माहिती देऊन ‌‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ महिलांसाठी वरदान ठरत असल्याचे गौरोवोद्गार काढले. या भेटीत त्यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

यानिमित्त झालेल्या कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर महिला अध्यक्षा मिनल पाटील यांनी रूपाली चाकणकर यांना पक्षाच्या महिला विभागाकडून सुरू असलेल्या कामांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या समर्थनार्थ वॉल सिग्नेचर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महिला सक्षमीकरणासाठीच्या धोणावर आधारीत योजना पिंक रिक्षा योजना, अन्नपूर्णा योजना ,मुलींना मोफत शिक्षण ह्या सारख्या अनेक योजनांच्या समर्थनार्थ मानवी साखळी आयोजित केली.

यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पवार, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, जळगाव महिला निरीक्षक अश्विनी मोगल, महिला जिल्हा अध्यक्षा कल्पणा पाटील, विभागीय युवती अध्यक्षा अभिलाषा रोकडे, युवती जिल्हा अधक्षा मोनाली पवार, शहर कार्याध्यक्षा लता मोरे, उपाध्यक्ष सोनाली देऊलकर, उपाध्यक्ष अर्चना कदम, जुलेखा, लता राठोड, वैद्यकीय युवक अध्यक्ष विकी राजपूत, विद्याथ सेना जिल्हा अध्यक्ष निशांत चौधरी विद्याथ सेल शहर अध्यक्ष फैजल, शहर उपाधक्ष योगेश कदम, कार्यालयीन सरचिटणीस योगेश आदी उपस्थित होते.