Jalgaon News : महिलेवर चाकूहल्ला, कारण वाचून बसेल धक्का

जळगाव :  दोन वर्षांपासून ओळख असताना बोलत नाही, शरीरसंबंध ठेवून देत नसल्याच्या गंभीर कारणावरून एकाने महिलेला धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केली. रावेर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. याप्रकरणी  सावदा पोलीस ठाण्यात एकाविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सिध्दार्थ बळीराम भालेराव (३६) याची महिलेशी ओळख होती. दोन वर्षांपासून सदरील महिलेने सिध्दार्थ सोबत बोलणे बंद केले होते. याचा राग मनात ठेवून ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता शेतात काम करत असताना संशयित आरोपी सिध्दार्थ भालेराव हा तिच्याजवळ आला. तु माझ्याशी का बोलत नाही माझ्याशी शरीरसंबंध का ठेवत नाही असे बोलून धारदार वस्तून वार करून तिला गंभीर जखमी केले.

तसेच भांडण सोडवासोडव करणाऱ्या इतर दोन जणांना देखील मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर तातडीने महिलेने पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी संशयित आरोपी सिध्दार्थ भालेराव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.