Jalgaon News : विनापरवाना लाकडाची वाहतूक; ट्रक-ट्रॅक्टर जप्त

जळगाव : विनापरवाना लाकडाची वाहतूक करणारा ट्रक व ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. त्यामुळे लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.  रावेर वनविभागाच्या गस्ती पथकाने गुरवार, ३ रोजी ही कारवाई केली.

गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वन विभागाचे गस्तीपथक रावेर ते बर्‍हाणपूर रस्त्याने गस्त करीत असताना खानापूर गावाजवळ संशयित मिनी ट्रक आल्यानंतर वाहनाची तपासणी केली. दरम्यान, वाहनात जळाऊ लाकूड भरलेले दिसले तर वाहन चालकाकडे परवाना नसल्याने वाहन जप्त करून वनविभागाच्या शासकीय आगारात लावण्यात आले.

या कारवाईत 11 हजार 102 रुपये किंमतीचे पंचरास जळाऊ लाकूड, दोन लाख रुपये किंमतीचा मिनिट्रक जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अहिरवाडी वनपाल यांच्या तक्रारीवरून मिनी ट्रकवरील चालक आरोपी शेख ईस्माईल शेख जावीद (21, ईमामवाडा, रावेर) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

धुळे वनसंरक्षक ऋषिकेश रंजन, यावल वनविभाग जळगावचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिरवाडी वनपाल राजेंद्र सरदार, सहस्रलिंग वनपाल अरविंद धोबी, वाघझिरा वनपाल विपूल पाटील, फैजपूर वनपाल अतुल तायडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

यावल पूर्वचे वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे, गस्ती पथकाचे वनपरीक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील, वनपाल आर.बी.थोरात, वाहन चालक योगीराज तेली, कॉन्स्टेबल सचिन तडवी खिरोदा ते फैजपूर रस्त्याने गस्त करीत असताना 2 रोजी सायंकाळी 6.30 वाजता स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 बी.जी.3621) हे विनापरवाना लाकूड वाहतूक करताना आढळून आल्याने ट्रॅक्टर मुद्देमालासह जप्त करण्यात आले. याप्रकरणी लाकडास ट्रॅक्टर मुख्य विक्री केंद्र, यावल येथे जमा करण्यात आले.