Jalgaon News : शेतकऱ्याने फिरविला उभ्या कापसाच्या पिकावर ट्रॅक्टर, डोळ्यात तराळले अश्रू

जळगाव : खेडी (ता. अमळनेर) येथे एका शेतकऱ्याने उभ्या कापसाच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. दरम्यान, सरदार कंपनीच्या खताची मात्रा दिल्यामुळे हे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनी धाडसी निर्णय घेत शेतातील कापसाच्या उभ्या पिकावर त्यांनी भावनिक होत रोटाव्हेटिर फिरवला.  यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तराळलेले होते.

अमळनेर तालुक्यातील खेडी गावातील शेतकरी उमेश धनराज पाटील यांनी जूनच्या पहिल्याच आठवड्यात आपल्या ८ एकरावर उन्हाळी कापसाची लागवड केली होती. परंतु आज अडीच महिने उलटून देखील कापूस पीक परिपक्व होत नसल्याचे लक्षात आले. याची सरदार कंपनीच्या खताची मात्रा दिल्यामुळे हे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनी धाडसी निर्णय घेत शेतातील कापसाच्या उभ्या पिकावर त्यांनी भावनिक होत रोटाव्हेटिर फिरवला.

दरम्यान, जड अंतकरणाने कापसाच्या उभ्या पिकावर ट्रॅकटर चालवताना उमेश पाटील यांच्या डोळ्यात अश्रू तराळलेले होते. एकीकडे निसर्गाच्या भरवशावर शेतकरी लाखांची उधळण करीत असतो तर दुसरीकडे, बळिराजाची आर्थिक लूट व्हावी याच उद्देशाने कमी काळात धनाढ्य होण्याची संधी ह्या खत कंपन्या शोधत असतात; हे देखील सत्य नाकारता येत नाही.