Jalgaon News : शौचासाठी गेला अन् झाला घात, घटनेमुळे आहीरवाडीत हळहळ

जळगाव :  पाय घसरून विहिरीत पडल्याने एका प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रावेर तालुक्यातील आहीरवाडी येथे  मंगळवार, ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कांतीलाल उर्फ चंद्रकांत यादव सावळे (४२) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

रावेर तालुक्यातील आहीरवाडी येथे कांतीला सावळे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. मंगळवार, ३ रोजी सायंकाळी शौचासाठी ते शेतातील विहिरीजवळून पायी जात असताना त्यांचा पाय घसरला.

त्यामुळे ते विहिरीत पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान गावातील ग्रामस्थांनी धाव घेवून काही तरूणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. रावेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.