जळगाव : राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणा-या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र इ.व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग शासन निर्णय क्रमांक ज्येष्ठना २०२२/प्रक्र.३४४/सामासु मुंबई दि.०६फेब्रुवारी, २०२४ नुसार मान्यता देण्यांत आली आहे.
योजनेचे स्वरूप – सदर योजनेअंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/दुर्बलतेनुसार सहायभूत साधने/उपकरणे खरेदी करता येतील. (उदा-श्रवणयंत्र, ट्रायपांड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ) तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाव्दारे नोदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाव्दारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र/प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.
योजनेचे निकष – अ) नागरिकांनी 31 डिसेंबर, 2023 अखेर पर्यंत वयाची ६५ वर्षे पुर्ण केलेली असावी आ) लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु २ लाखाच्या आत असावे. लाभार्थ्यांने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील, इ) सदर व्यक्तीने मागील ३ वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारव्दारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्त्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे याबाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. ई) पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तीक आधार संलग्न बचत खात्यात ३०००/- थेट लाभ वितरण प्रणालीव्दारे वितरीत झाल्यावर सदर योजने अंतर्गत विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ केंद्राव्दारे प्रशिक्षण घेतल्यांचे लाभार्थ्यांचे देयक (Invoice) प्रमाणपत्र ३० दिवसाच्या आत सहायक आयुक्त, समाज कल्याण जळगांव यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रिय सामाजिक उपक्रम (CPSU) संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर ३० दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील, अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल. लाभार्थी हा बीपीएल रेशनकार्ड धारक असावा.
योजनेचा लाभ घ्यावयासाठी आवश्यक कागदपत्रे – १, आधारकार्ड/मतदान कार्ड २. राष्ट्रीयकृत बँकेची बैंक पासबुक झेरॉक्स ३. पासपोर्ट आकाराचे २ फोटो ४. स्वयं-घोषणापत्र ५. शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे, जिल्हास्तर क्षेत्रासाठी या योजनेसाठी अर्ज करावयाचे ठिकाण: सहायक आयुक्त, समाज कल्याण जळगांव यांनी कळविले आहे.