जळगाव : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे सन १९२७ साली इंग्रजांच्या काळात स्थापन झालेल्या गुरु गोविंद विविध कार्यकारी विकास सोसायटी संचालित स्वस्त धान्य दुकानास आज आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
हा सोहळा सोसायटीच्या प्रांगणात पार पडला. आजच्या काळात सहकाराला आपले अस्तिस्त टिकवणे कठीण होत असतांना, अशा काळात एकमेव एखादी सहकारी सोसायटी जिल्ह्यात आयएसओ नामांकन मिळवते, ही आमच्यासाठी गर्वांची गोस्ट आहे, असे कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप वाघ होते. या वेळी प्रांत अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, जळगावचे सहायक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या सोहळ्यास ग्रामस्थांसह सोसायटीचे सर्व संचालक, ग्राम पंचायत सदस्य, उपसरपंच व विविध पदाधिकारी उपस्थित होते. चेअरमन शालिग्राम मालकर यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचे नियोजन केले. तर सचिव दीपक पाटील यांनी आभार मानले. या वेळी मान्यवरांनी सोसायटीतर्फे सुरु असलेल्या उपक्रमांचे कौतुक करुन उपस्थित संचालकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.