Jalgaon News: हिंदू मुलींना जाळ्यात ओढ… इमरानचा अफलातून फंडा; नेमकं काय घडलं?

जळगाव : लव्ह जिहाद स्टाईल प्रकाराचा पोलिसांच्या तपासातून भंडाफोड झाला. संशयित इमरान शब्बीर मन्यार (वय २३, रा. साक्री) हा महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जळगावात आला. लॅपटॉप, मोबाईल आणि पेनड्राईव्ह याचा वापर शिक्षणाऐवजी भलत्याच कामासाठी करत असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली. बनावट आधार कार्ड बनवून त्याच्यावर बनावट नाव टाकले आणि तो मीच आहे. हे पटविण्यासाठी या आधार कार्डावर त्याचा स्वत:चा फोटो लावल्याची बाबही उघडकीस आली. ही बाब गंभीर स्वरूपाची मानली जात असून स्वतःची खरी ओळख लपवून अन्य नावाचा आधार घेत त्याच्यावर स्वतःचा फोटो लावून ती जाहीरपणे मिरविण्याच्या मागचा उद्देश काय, या बाबीचा उलगडा करण्याच्या बाबतीत तपासाचे चक्रे फिरविली जात असल्याचे कळते. हे बनावट आधार कार्ड पोलिसांनी जप्त केले आहे.

२० वर्षीय तरुणीने सोमवार, १४ रोजी तक्रार रामानंदनगर पोलीस ठाण्यात दिली. रात्री गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवित याप्रकरणातील मुख्य संशयित इमरान मन्यार तसेच त्याचा साथीदार मित्र इकबाल खान गौस (वय २४, रा. पाथरी, जि. परभणी) या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. मंगळवार १५ ऑगस्ट रोजी दोघांना न्यायालयात हजर करत तपासासाठी पोलिसांनी पाच दिवसाची पोलीस कोठडी मागितली असता न्यायालयाने तीन दिवसांची म्हणजे १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी या दोघांना घेत गुन्हयाच्या तपासाला बुधवारी गती दिली आदर्शनगरातील भाड्याने घेतलेल्या आहे. रूमवर पोलीस धडकले. याठिकाणी संशयिताचे एक लॅपटॉप तीन मोबाईल तसेच दोन पेनड्राईव्ह तसेच आधार कार्ड जप्त केले. रामानंदनगरातील खोली, अजिंठा चौफुलीवरील हॉटेल इत्यादी ठिकाणीही पथकाने जाऊन गुन्हयाच्या तपासकामी माहिती जाणून घेतली. संशयिताचे अन्य साथीदार आहेत किंवा कसे? याबाबींनाही तपासात महत्व दिले जात असल्याचे समजते.

तंत्रज्ञान तज्ञांची मदत तपासात घेणार संशयिताकडून पथकाने जप्तकेलेले लॅपटॉप, तीन मोबाइल तसेच पेनड्राइव्ह यातील माहिती व त्याचा कशासाठी वापर केला जात होता, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस आयटी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असल्याचे सूत्रांकडून कळते. यातील नावे, व्हिडिओ तसेच फोटो याबाबीही तपासल्या जाणार असल्याचे समजते. हा संशयित कोणत्या संघटनेशी निगडित आहे किंवा कसे ? या अनुषंगानेही तपासातून तपासले जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

दरम्यान, गुरुवार, १७ रोजी दोघा संशयितांना न्यायालयात पोलिसांनी आणले. न्या. आर.वाय. खंडारे यांच्या न्यायालयात दोघांना हजर केले. संशयिताकडून ताब्यात घेतलेल्या या वस्तूबाबत तांत्रिक तपासाला गती न देणे आवश्यक असल्याने पोलिसांनी आज पोलीस कोठडी न मागता संशयितांना एमसीआर देण्याची विनंती केली. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने दोघांची पोलिसांनी कारागृहात रवानगी केली.

बनावट विवेक नावाचा घेतला आधार

संशयित इमरान याने बनावट आधार कार्ड बनावले. विवेक संजय सोनवणे असे बनावट नावाचा आधार घेत त्यावर स्वत:चा फोटो लावला. हे बनावट आधार कार्ड पाहिल्यानंतर पोलीस चक्रावले. बनावट आधार कार्ड बनवले कसे? याबाबत पथकाने त्याच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता पीआयएससीएआरटी हे अॅप डाऊनलोड केले, असं त्याने सांगितले. त्यापुढे मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे देत बनावट आधार बनविण्याचे रहस्य गुलदस्त्यात ठेवले.