जळगाव: येथील शिवाजी नगरातील माजी नगरसेवक दारकुंडे व मक्तेदार धांडे यांच्यात मोबाईलवर वाद झाले. वादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली.
मोबाईल फोनवरील बोलण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी मक्तेदार राहुल धांडे यांच्याविरुद्ध लेखी तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. धांडे यांनी मोबाईवर धमकी दिल्या प्रकरणी दारकुंडे यांच्याविरुद्ध पोलिसांत लेखी तक्रार दिली होती. दारकुंडे यांनी देखील बुधवारी धांडे यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.