---Advertisement---
जळगाव : दिवाळी सणात खबरदारी घेऊन उत्सव साजरा करावा. लहान मुलांना पालकांच्या देखरेखीखाली फटाके फोडण्यास द्यावीत, असे आवाहन जिल्हा पोलिसांनी केले आहे.
फटाके फक्त परवानाधारक विक्रेत्यांकडून घ्यावेत आणि सुरक्षित ठिकाणीच फोडावे. लहान मुलांना पालकांच्या देखरेखीखाली फटाके फोडण्यास द्यावीत. फटाके फोडताना सुती कपडे परिधान करावेत.
रुग्णालय व शाळा परिसरात फटाके फोडु नये. बाहेरगावी जात असल्यास शेजाऱ्यांना व जवळच्या पोलीस ठाण्यात जरुर कळवावे. बाजारपेठेत व गर्दीच्या ठिकाणी पाकीट, मोबाईल आणि मौल्यवान वस्तू सांभाळावे.
अनोळखी व्यक्तीपासून सावध राहावे, महिलांनी मौल्यवान दागिने घालुन एकट्याने फिरणे टाळावे. दागिने दिसणार नाहीत, याची काळजी घ्यावी. संशयास्पद दुचाकीस्वारांपासून सावध राहावे.
घर सोडताना दरवाजे खिडक्या व्यवस्थित बंद करावे. घराला मजबूत व अतिरिक्त कुलूप लावावे. अनोळखी फेरीवाले किंवा मदतनीस यांची माहिती घेतल्याशिवाय घरात प्रवेश देऊ नये.
शक्य असल्यास घराच्या परिसररात सीसीटीव्ही कॅमेरे लावुन ते चालू असल्याची खात्री करावी. मोफत बक्षीस किंवा सवलतीच्या लिंक्सवर क्लिक करु नये, असे कळविण्यात आले आहे.