जळगाव : शाळेबाबत माहितीचा अधिकार टाकल्याच्या कारणावरून 35 वर्षीय तरूणाला महाबळ येथील पशूवैद्यकीय दवाखान्याजवळील अंडा-पावच्या गाडीवर आठ संशयीतांनी मारहाण करीत जखमी केले. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. रामानंद पोलिसात या प्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
आठ संशयीतांविरोधात गुन्हा
अमोल भास्कर पाटील (35, समता नगर, जळगाव) हा तरूण मजुीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी रात्री 9.30 वाजता अमोल पाटील हा महाबळ येथील पशूवैद्यकीय दवाखाना येथील आम्लेट गाडीवर उभा असताना संशयीत आरोपींनी एका शाळेत माहिती अधिकार अर्ज का टाकला? म्हणत त्यास लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली. या प्रकरणी सचिन तडवी, इब्राहिम तडवी, आशिष तडवी, पुरूषोत्तम चिमणकर, स्नेहल इब्राहिम तडवी, अमिता इब्राहिम तडवी, सुजाती इब्राहिम तडवी (सर्व रा. संभाजी नगर) व अन्य एका अनोळखीविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अजित पाटील करीत आहे.