---Advertisement---
जळगाव : राज्य मार्ग परिवहन महामंडळातील जळगाव विभागात लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या पदोन्नती भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. या प्रकरणाकडे लक्ष वेधत, आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत या प्रकरणात काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा सभागृहात केली.
जळगाव एसटी विभागात लिपिक-टंकलेखक संवर्गाची पदोन्नती भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. परंतु यात मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. खडसे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात परिवहन विभाग मंत्री यांना प्रश्न विचारत काय कारवाई करण्यात आली याची विचारणा केली.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी तक्रार प्राप्त झाली असल्याचे सांगून एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता खात्यामार्फत चौकशी करण्यात आली आहे. तसेच चौकशी अहवाल प्राप्त असून अहवालात नमूद विभाग नियंत्रक यांच्यावर खातेअंतर्गत कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.