---Advertisement---
जळगाव : जनमानसाची कास धरून खान्देशात यशस्वी वाटचाल करणारा ‘जळगाव तरुण भारत’ आपला २८ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. आज रविवारी (दि. ३ ऑगस्ट २०२५) सायंकाळी ५ ते १० दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल हॉल, (लेवा भवन) BSNL ऑफिसच्या मागे, आंबेडकर मार्केटजवळ, जळगाव येथे हा स्नेहमेळावा आयोजित करीत आहोत.
समृद्ध वैचारिक परंपरा लाभलेला ‘जळगाव तरुण भारत’ दोन दशकांहून अधिक काळापासून राष्ट्रहिताची भावना समाजमनात पेरण्याचे काम निरंतर करीत आहे. त्यामुळे ‘जळगाव तरुण भारत’ला वाचक आणि स्नेहीजनांची समर्थ साथ सदैव लाभली आहे.
एक स्नेहबंध निर्माण झाला आहे. हे नातं अधिक दृढ करण्यासाठी वर्धापनदिनानिमित्त रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी वाचक, वितरक, विक्रेते आणि स्नेहीजनांसाठी स्नेहमेळावा आयोजित करीत आहोत.
कार्यकारी संचालक रवींद्र लहा, सहप्रकल्प प्रमुख संजय नारखेडे, संपादक चंद्रशेखर जोशी, शाखा व्यवस्थापक भावना शर्मा व समस्त संचालक मंडळ, सर्व वार्ताहर आणि कर्मचारीवृंद यांच्या वतीने, आपण अवश्य यावं, यासाठी हे आग्रहाचं निमंत्रण…