जळगाव : हवामान विभागाने राज्यात ७ ते ८ एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्याच वेळेनुसार अवकाळी पावसाने राज्यातील काही भागात हजेरी लावली. तसेच जळगाव जिल्ह्यात देखील हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा फटका काही तालुक्यात बसला आहे.
कोणत्या तालुक्यात?
चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरात (ता. ७) सायंकाळी पाचपासून बेमोसमी पावसाने हजेरी लावली, तसेच सातत्याने वाऱ्याचा वेग जोरात होता. शुक्रवारी सकाळी पाचपासून ढगांच्या कडकडाटामुळे सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली.
बेमोसमी पावसामुळे टरबूज मोठ्या प्रमाणावर शहरातील भडगाव रस्त्यावर विक्रीसाठी आले होते, तसेच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अक्षय तृतीया असल्यामुळे, आंबे खाण्यास त्या दिवसापासून सुरवात होते. त्यामुळे ग्रामीण भागात बेमोसमी पावसामुळे आंबा व द्राक्षांचे नुकसान होणार आहे.