Jamner : कृषि विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डॉ.अभिमन्यू चोपडे, रुपेश बिऱ्हाडे सन्मानित

Jamner :  आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत 2022-23 राज्यस्तरीय कार्यशाळा मधुरम लॉन नाशिक येथे कार्यक्रम पार पडला. यात  कृषि विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल  जामनेर येथील तालुका कृषि अधिकारी डॉ.अभिमन्यू चोपडे,  पोकरा योजनेचे समुह सहाय्यक रुपेश बिऱ्हाडे सन्मानित करण्यात आले

 

जामनेर येथील तालुका कृषि अधिकारी डॉ.अभिमन्यू चोपडे व पोकरा योजनेचे समुह सहाय्यक रुपेश बिऱ्हाडे यांनी तालुकास्तरावर सेल्फी पाईंन्ट, प्रभात फेरी, मिलेट दौड,पाककला स्पर्धा,आंतरराष्ट्रीय योगा दिवस,कार्यशाळा,शिबीर,प्रशिक्षण, प्रदर्शन यांचे उत्कृष्ट नियोजन करुन यशस्वीरित्या पार पाडले.

 

या बद्दल डॉ.अभिमन्यू चोपडे व पोकरा योजनेचे  रुपेश बिऱ्हाडे यांचे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मोहन वाघ ( विभागीय कृषि सहसंचालक नाशिक ),संभाजी ठाकूर ( विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी नाशिक ),सुनिल वानखेडे ( विभागीय नोडल अधिकरी स्मार्ट नाशिक ),कुर्बान तडवी ( जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे ),डॉ. विशाल गुंजाळ,महेंद्र छोरीया, रामसिंग वळवी,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.