---Advertisement---
जामनेर : तालुक्यातील नेरी चिंचखेडा यासह विविध गावांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागाचे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आज नेरी चिंचखेडा या गावांना मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली.
या गावातील पिके व शेती पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी माती वाहून गेली आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचा सामना करावा लागत आहे. हे सर्व बाबींची पाहणी करून फक्त पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे. निसर्गाचे अस्मानी संकटात राज्य सरकारने उभे आहेत असे याप्रसंगी गिरीश महाजन यांनी सांगितले.
जामनेर तालुक्यातील नेरी, जामनेर, वाकडी, शेंदुर्णी आणि तोंडापूर या गावाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मौजे नेरी बु. येथे २१ ते ४० घरांमध्ये पाणी शिरले असून पशुधनाचे नुकसान झाले आहे. नेरी दिगर येथे १५ ते २० घरांमध्ये व ५ दुकानांमध्ये पाणी साचले असून एक कुटुंब शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. माळपिंप्री येथे पिकांचे मोठे नुकसान झाले असून सुनसगाव खुर्द व सुनसगाव बु. या गावांचा संपर्क तुटला आहे.
या दौऱ्यात मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार नानासाहेब आगळे, संभा विभाग अधिक्षक प्रशांत सोनवणे, जिल्हा भाजपाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, भाजप कार्यकर्ते व शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते