नगर : अहमदनगर जिल्ह्यातील उंबरे गावात घडलेल्या लव जिहाद धर्मांतरण प्रकरणी आमदार नितेश राणे, हे सकल हिंदू समाज आयोजित मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. नितेश राणेंच्या नेतृत्वात राहुरीत जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील Y.M.C.A मैदान राहुरी येथे मोर्चा होणार आहे. उंबरे या गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. धर्मांतर करण्यासाठी सोशल मीडियाद्वारे बदनामी करण्याचे धमकी देऊन मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेमुळे अहमदनगर जिल्हा हादरून गेला आहे.
याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. उंबरे या एकाच गावातील मुलींनी गेल्या चार दिवसात तीन गुन्हे दाखल केले. यामुळे गावात एकच चिंतेचे वातावरण होते. या प्रकरणातील फिर्यादी मुली या हिना शेख हिच्याकडे खाजगी शिकवण्यासाठी येत होत्या शिकवणीसाठी गेल्यावर अवेज शेख आणि कैफ शेख दोघे वारंवार पाठलाग करून मुलींना आडवीत होते.
यात सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये अल्ताफ बाबूलाल शेख, कैफ जिलानी शेख, शाकीर यासीन सय्यद,हिना मुस्ताक पठाण, सलीम पठाण, सोहेल शेख आणि अवेज निसार शेख असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून तसेच यामधील हुसेन उर्फ भैय्या शेख अद्याप फरारी आहे. तर आवेज शेख अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.