---Advertisement---
Maratha reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत 20 जानेवारी रोजी उपोषण करणार असल्याची घोषणा केली. मुंबईत या उपोषणावेळी ३ कोटी मराठा आंदोलक येईल, असा दावा देखील जरांगे यांनी केला आहे. त्यानंतर ओबीसी समाजानेही २० जानेवारीला आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. मात्र, याचदरम्यान जरांगे यांनी मुंबईत आम्हाला तीन मैदाने लागतील. त्यासाठी सरकारही परवानगी देईल,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे म्हणाले, ‘मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळांनी मुंबईतील मैदानांची पाहणी केली आहे. त्यानंतर मुंबईत जाणाऱ्या मराठा आंदोलकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे आम्हाला तीन मैदाने लागतील. मुंबईतील शिवाजीपार्क, बीकेसी आणि आझाद मैदान हे तीन मैदाने लागतील. मात्र, आमरण उपोषण हे आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क या दोन्ही पैकी एका मैदानात होईल.