आयसीसीने वर्ल्ड कपनंतर जून महिन्यातील ‘प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार’ जाहीर केला आहे. आयसीसी महिला आणि पुरूष हे दोन्ही पुरस्कार टीम इंडियाच्याच खेळाडूंना मिळालेत, अर्थात जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधाना यांनी आयसीसीचा महिन्याला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारावर नाव कोरलं आहे.
पुरूषांमध्येही भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला हा पुरस्कार मिळाला. आयीसीसीने बुमराह, रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानच्या गुरबाज याला नामांकित केलं होतं. मात्र बुमराहने बाजी मारली आणि जून महिन्यातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार जिंकला.
महिला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार भारताची सलामीवीर स्मृती मंधाना हिने जिंकला आहे. जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 113, 136 आणि 90 धावांची तिने खेळी केली होती.
स्मृती मंधानाने एकमेव कसोटी सामन्यातही शतक करत भारताला चांगली सुरूवात करून दिली. आता होणाऱ्या आशिया कपमध्ये तिच्याकडून सर्वांना अपेक्षा असणार आहेत.