---Advertisement---

ICC Champions Trophy 2025 :  जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

---Advertisement---

ICC Champions Trophy 2025 :  भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळणार की नाही, याबद्दल सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. आता स्पर्धेपूर्वी, बुमराहच्या फिटनेसबद्दल एक मोठी अपडेट आली आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटीत जसप्रीत बुमराहला पाठदुखीचा त्रास जाणवला, ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर तो अजूनही पुनर्वसन प्रक्रियेत असून त्याच्या फिटनेसवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. शनिवारी त्याच्या दुखापतीचे स्कॅन करण्यात आले आणि तो अहवाल न्यूझीलंडमधील डॉक्टरकडे पाठवला गेला आहे. तसेच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) च्या वैद्यकीय पथकानही या अहवालाची वाट पाहत आहे.

BCCIच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली जसप्रीत बुमराहच्या दुखापतीचे स्कॅन आणि संपूर्ण तपासणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर, तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे पुनर्वसन प्रक्रियेस सुरुवात करणार आहे. अहवालानुसार, जस्सी पुढील २४ ते ४८ तासांत शारीरिक हालचाली, काही प्रमाणात जिम वर्क, तसेच हलकी गोलंदाजी सुरू करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या काय आहे?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तात्पुरत्या संघात बदल करण्याची अंतिम मुदत काही दिवसांवर आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड बुमराहच्या उपलब्धतेबाबत वेट अँड वॉच भूमिकेत राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी २०२३ च्या वन डे वर्ल्ड कपदरम्यान हार्दिक पांड्याच्या दुखापतीच्या बाबतीतही त्यांनी हीच भूमिका घेतली होती.

हेही वाचा : वीज बिल कमी करण्याच्या बदल्यात पत्नीची मागणी? शेतकऱ्याचा जेईवर गंभीर आरोप!

“जस्सी खेळण्याची केवळ १% शक्यता असली तरी BCCI वाट पाहण्याची शक्यता आहे. त्यांनी हार्दिकसोबतही असेच केले. त्यांनी प्रसिद्ध कृष्णाला पर्याय म्हणून घेण्यापूर्वी जवळजवळ दोन आठवडे वाट पाहिली होती. शुभमन गिल डेंग्यूने आजारी असतानाही, त्यांनी पर्यायी खेळाडू शोधण्याचा विचार केला नव्हता. संघात बदल करण्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी आहे. जर तो फिट झाला नाही, तर ते नंतरच्या टप्प्यात बदली खेळाडू शोधण्यासाठी इव्हेंट टेक्निकल कमिटीशी संपर्क साधू शकतात,” असे एका सूत्राने TOI ला सांगितले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीनंतर भारताच्या या वेगवान गोलंदाजाला पाच आठवड्यांसाठी विश्रांती घेण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्याच्या दुखापतीची व्याप्ती आणि पुनरागमनाची तारीख याबद्दल BCCI ने अधिकृत माहिती दिलेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी बुमराहला निवडण्यात आले होते, पण नंतर त्याच्या जागी वरुण चक्रवर्तीचा समावेश करण्यात आला. सध्या हर्षित राणा आधीच संघात असून, वरुण वन डे संघात सामील झाला आहे. त्यामुळे जस्सीच्या अनुपस्थितीत पर्यायी गोलंदाजांच्या शक्यता तपासल्या जात आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जर बुमराहला NCA कडून वेळेत परवानगी मिळाली नाही, तर भारतीय संघ व्यवस्थापनाने पर्याय तयार ठेवले आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही दुसऱ्या वन डे सामन्यात पदार्पण करणाऱ्या वरुण चक्रवर्तीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment