पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दि. ६ ऑगस्ट रोजी जे डब्लयू मेरिएटला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट अजित पवारांनी घडवून आणल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जयंत पाटील भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याचे चिन्ह दिसत आहे. त्याचवेळी जयंत पाटलांसोबत सुमन पाटील आणि प्राजक्त तनपुरेही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देतील असं सांगितलं जातंय.
पावसाळी अधिवेशनाचे सुप वाजण्याच्या दोन दिवस आधीच झालेल्या एक चर्चेदरम्यान अजित पवार यांनी जयंत पाटील यांना आम्ही तुम्हाला बोलवतोय,परंतु तुम्हीच येत नाही.तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही अशा प्रकारचे वक्तव्य करून त्यांना सूचक इशारा दिला होता.
त्यानंतर अजित पवार यांनी पुढाकार घेत जयंत पाटील यांना पुण्याला बोलावून घेत अमित शाह यांची भेट घडवून आणली त्यामुळे राज्यातील समीकरणांमध्ये आता नवा आयाम जोडला जाणार आहे.जयंत पाटील यांच्या सरकारमध्ये येण्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सांगली जिल्ह्यामध्ये त्याचा महायुतीला फायदा होणार आहे,अशी अटकळ बांधण्यात येत आहे.