लातूर : लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ लातूरमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. लिंगायत महासंघाच्या वतीने आमदार आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. पक्षश्रेष्ठींनी आव्हाडांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी लिंगायत समाजातर्फे करण्यात आली आहे.
महात्मा बसवेश्वर चौक येथे बसव सेवा संघाच्या वतीने आव्हाड यांच्या प्रतिमेस प्रतीकात्मक जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या वेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष बालाजी पिंपळे, अमित पाटील, सुनील ताडमाडगे, ओंकार ब्याकुडे, चंदू बुलबुले, बळीराम दगडे, अभी वाघमारे, ईश्वर तत्तापुरे, निखिल गावकरे, अमित खराबे, शशिकांत बुलबुले, विकास क्षिरसागर, निलेश गदगे उपस्थित होते.
या वेळी महासंघाच्या वतीने आव्हाडांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने महात्मा बसवेश्वर चौकात शहर जिल्हाध्यक्ष अॅड. गणेश गोमचाळे व प्रदेश प्रवक्त्या प्रा. प्रेरणा होनराव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.