तरुण भारत लाईव्ह । जळगाव : नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव आणि रियल इंडो ग्लोबल विजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन, धुळे यांच्यातर्फे ‘भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष : यश आणि आव्हाने’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शिक्षक, प्राध्यापक आणि प्राचार्य यांचा राष्ट्रीय शिक्षारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
चर्चासत्राचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य दिलीप रामू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी श्री. शि. वि. प्र. संस्था, धुळेचे उपाध्यक्ष आणि सिनेट सदस्य डॉ. एस. टी. पाटील, डॉ. सूर्यकांत थोरात (नांदेड), व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी, शिक्षारत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, डॉ. पी. आर. चौधरी, प्राचार्य डॉ. आर. आर. अहिरे, प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, प्राचार्य डॉ. विलास आवारी, डॉ. सचिन नांद्रे, डॉ. गुरुप्रीतसिंग, डॉ. लियाकतखान, पुरस्कार समितीचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, डॉ. संभाजी पाटील, डॉ. मोहन पावरा, डॉ. प्रवीण मोरे व डॉ. दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात श्री. दिलीप रामू पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थी घडविण्याची ताकद ही फक्त शिक्षकांमध्येच असते. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी हा सृजनशील विचार करून शैक्षणिक व बौद्धिक विकास करीत असतो. याप्रसंगी त्यांनी शिक्षकांचे प्राचीन काळापासून असलेले महत्त्व विशद केले.
यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. याप्रसंगी दिलीप रामू पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना संस्थेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
तसेच याप्रसंगी भारतातील जवळजवळ 75 मान्यवरांना भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्ताने भारतीय शिक्ष रत्न हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रा. डॉ. संभाजी पाटील यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या धोरणांविषयी माहिती दिली. या चर्चासत्रासाठी संपूर्ण भारतातून 105 पेपर आले होते. सूत्रसंचालन डॉ. प्रवीण मोरे व डॉ. दीपक पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. प्रशांत वानखेडे, डॉ. प्रवीणसिंग गिरासे, डॉ. संजय वाघ, डॉ. सचिन गोवर्धने, डॉ. संदीप काळे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. वकार शेख, डॉ. गौतम भालेराव, प्रा. जितेंद्र पाटील, दिव्या संभाजी पाटील, जिवितेश दीपक पाटील, सौरभ बिर्हाडे, सुदाम रमेश पावरा आदींनी परिश्रम घेतले.