---Advertisement---
जळगाव : व्यसनामुळे व्यक्तीचे आयुष्य उध्वस्त होत असते. त्यांचे कौटूंबिक, सामाजिक स्थान कमी होते. तरुण पिढीत व्यसनाधीनता वाढीस लागत आहे, ही एक चिंतेची बाब ठरत आहे. अशा व्यक्तींना व्यसनमुक्त करण्याचे मोलाचे कार्य जीवनज्योती व्यसनमुक्ती उपचार केंद्र कार्य करीत आहे. केंद्राचे डॉ. बाळासाहेब मोहन कुमावत यांच्या नेतृत्वाखाली विकसित झालेल्या “Herabal Anti -Addictive Oral Formulation “या आयुर्वेदिक ओषधाला भारत सरकारकडून अधिकृत पेटंट मान्यता प्राप्त झाली आहे.
“Herabal Anti -Addictive Oral Formulation” दारू, तंबाखू, गुटखा, आणि इतर व्यसनांवर प्रभावी ठरणारे औषध आहे. हे औषध डॉ. बाळासाहेब कुमावत, प्रितम बाळासाहेब कुमावत आणि डॉ. अश्विनी बाळासाहेब कुमावत यांच्या अनेक वर्षांच्या वैद्यकीय अनुभव, संशोधन व हजारो रूग्णांवरच्या यशस्वी उपचारांचे फलित आहे. मागील ३० वर्षांपासून संशोधन करुन आयुर्वेदिक व्यसनमुक्ती औषध तयार करण्यात डॉ . कुमावत यांना यश आले आहे.
डॉ. कुमावत हे १९९२ पासून व्यसनमुक्ती क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की, “भारतातील लोकांना व्यसनमुक्त बनवणे हे आमचे ध्येय आहे. पेटंट मान्यता ही त्या ध्येयाकडे नेणारी भक्कम पायरी आहे. पेटंट मान्यता मिळाल्यानंतर “Herabal Anti -Addictive Oral Formulation “राष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध करण्याची प्रक्रीया सुरू झाली असून, लवकर या औषधाव्दारे व्यसनमुक्ती मोहिमेला जागतिक गती मिळणार आहे. .