तरुण भारत लाईव्ह । २ सप्टेंबर २०२३। जेट एयरवेज लिमिटेडचे संस्थापक नरेश गोयल यांना नवी दिल्ली अंमलबजावणी संचालनालयाने बँक फसवणुकीशी संबंधित मनी लौंड्रीन्ग प्रकरणात अटक केली. त्यांच्यावर ५३८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. नरेश गोयल यांना आज विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले जाणार आहे. नरेश गोयल यांना शुक्रवारी ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशीकरता बोलविण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉंडरिंग कायदानव्ये अटक करण्यात आली.
सूत्रानुसार, नरेश गोयल यांच्याविरुद्ध कॅनरा बँकेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. एफआयआरमध्ये त्यांनी असे म्हटले होते कि,त्यांनी ८४८.८६ कोटी रुपयांची क्रेडिट मर्यादा आणि कर्ज हे मंजूर केले होते. त्याचपैकी ५३८.६२ कोटी रुपये थकीत होते. सीबीआयने ५ मे ला नरेश गोयल यांच्या मुंबईतील सात ठिकाणी छापेमारी केली होती. या कारवाईमध्ये नरेश गोयल, अनिता गोयल त्याचबरोबर गौरांग आनंद शेट्टी यांच्या घरावर तसेच कार्यालयावर छापे टाकण्यात आले होते. सीबीआयच्या एफआयआरच्या आधारावर १९ जुलै ला ईडीने गोयल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यानंतर ईडीने नरेश गोयल तसेच त्यांच्या साथीदारांच्या छापे टाकून शोध घेतला आणि आता कारवाई करण्यात आली आहे.
कंपनीच्या फॉरेन्सिक ऑडिट मध्ये त्यांनी एकूण कमिशन खर्चापैकी संबंधित कंपन्यांना १,४१०.४१ रुपये दिले अशा प्रकारे कंपनीतून हे पैसे बँकेतून काढण्यात आले. पगार, फोन बिल,आणि गोयल परिवारातील कर्मचाऱ्यांचे यासारखे वैयक्तिक खर्च जेटच्या उपकंपनी जेट लाईट किंवा JIL कडून दिले गेले होते.या आरोपाव्यतिरिक्त फॉरेन्सिक ऑडिटमध्ये असे दिसून आले कि JIL कडून आगाऊ पेमेंट आणि गुंतवणुकीद्वारे निधी पळविला गेला आता वादात अडकल्यानंतर अनेक एजन्सी जेट एयरवेजच्या कारभाराची चौकशी ईडी, सीबीआय, आयकर,करत आहे