झेलम एक्सप्रेस तब्बल ११ तास एकाच ठिकाणी थांबली; जळगावहून जम्मू काश्मीर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

#image_title

जळगाव । पंजाबमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा रेल्वे सेवेवरही परिणाम झाल्याचं दिसून येत असून अशातच जळगाव येथून 29 डिसेंबर रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास जम्मू-काश्मीरच्या दिशेने निघालेली झेलम एक्सप्रेस जालंदरजवळ तासंतास उभी होती. एक, दोन तास नव्हे तर तब्बल ११ तास एकाच ठिकाणी ही गाडी थांबली होती. त्यावेळी रेल्वेतील अनेक प्रवाशांकडे जेवणही नव्हते. पाणी संपले होते. अनेक अडचणींना रेल्वे प्रवाशांना सामोरे जावे लागले.

याबाबत असे की, पुण्यावरुन २८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.४० वाजता झेलम एक्स्प्रेस निघाली. ही गाडी २९ डिसेंबरच्या रात्री दोन वाजेल भुसावळात पोहोचली. ही गाडी जालंधर कॅन्ट रेल्वे स्थानकावर दुसऱ्या सकाळी ७.२० वाजता पोहचली. त्या गाडीची पोहचण्याची वेळ सकाळी ५.१० होती. जालंधरला पोहचल्यावर दुपारी चार वाजेपर्यंत झेलम एक्स्प्रेस जालंधर रेल्वे स्थानकावर थांबवली गेली. तब्बल ११ तास ही ट्रेन जालंधर रेल्वे स्थनावर उभी होती. 11 तासानंतर झेलम एक्सप्रेस पठाणकोटच्या दिशेने रवाना झाली आहे.

प्रवाशांचे हाल
झेलम एक्स्प्रेसमधील प्रवाशांना अनेक तास ट्रेनमध्येच बसून राहावे लागले.त्यानंतरही रेल्वेकडून प्रवाशांसाठी कोणत्याही सुविधा दिल्या गेल्या नाही. ट्रेनमध्ये आणि रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ आणि पाणी मिळणेही प्रवाशांना अवघड झाले. झेलम एक्स्प्रेसमध्ये लष्कराचे जवान होते. ते कर्तव्यावर जात होते. त्यांच्यासाठीही काहीच पर्यायी सुविधा करण्यात आली नाही.