मोठा निणर्य! रजिस्टर्ड पोस्ट सेवा १ सप्टेंबरपासून होणार बंद

---Advertisement---

 

जळगाव : इंडिया पोस्टची नोंदणीकृत पोस्ट सेवा पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून नागरिकांना सेवा देत आहे. विश्वासार्हता आणि परवडणाऱ्या किमतीसाठी ओळखली जात होती. ती रजिस्टर्ड पोस्ट सेवा भारतीय टपाल खात्याकडून १ सप्टेंबर २०२५ पासून बंद करण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्थात आता रजिस्टर्ड पोस्ट सेवेचे स्पीड पोस्टमध्ये विलीनीकरण केले जाणार आहे. यात टपाल विभागाचे आधुनिकीकरणासह अधिक जलद गतीने कामकाज सुलभतेने होणार असल्याचे जळगाव जिल्हास्तरावरील भारतीय पोस्ट ऑफिस विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोस्ट म्हटल्यानंतर चौकात, बसस्टॅण्ड, वा पोस्टाच्या बाहेर चौकोनी अथवा गोल लाल रंगाचा कुलुप लावलेला डबा. आणि २५ पैशाचे कार्ड, आंतरदेशीय वा पिवळया रंगाचे दोन रुपयांचे पोस्टाचे पाकीट किंवा शाळेचे निकाल, नोकरीचे पत्र, आणि अत्यंत महत्त्वाचे तातडीचे संदेश लिखीत परंतु संक्षिप्त असे तार स्वरूपात पत्र किंवा कोर्टाची नोंटीस यासाठी ‘रजिस्टर्ड पोस्ट’ सेवा वर्षानुवर्षे वापरात आहे.

अल्पदरात कागदपत्र खात्रीने पोहचवणारी जुनी आणि विश्वासार्ह रजिस्टर्ड पोस्ट सेवा भारतीय टपाल विभागाकडून १ सप्टेंबरपासून कायमची बंद करण्यात येत असल्याचा निर्णय घेतला आहे.

रजिस्टर पोस्ट अर्थात रजिस्टर एडी ची किंमत २५.९६ रुपयांपासून सुरू झाली आणि प्रत्येक अतिरिक्त २० ग्रॅमसाठी ५ रुपये द्यावे लागत होते. ही सेवा विशेषतः गावांमध्ये आणि लहान शहरांमध्ये राहणाऱ्यांसाठी एक स्वस्त आणि विश्वासार्ह पर्याय होता.

दुसरीकडे, ५० ग्रॅमपर्यंत स्पीड पोस्टची सुरुवातीची किंमत ४१ रुपये आहे, जी रजिस्टर्ड पोस्टपेक्षा २०-२५ टक्के जास्त महाग आहे. या बदलामुळे, लहान व्यापारी, शेतकरी आणि दुर्गम भागात राहणाऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---