Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचं पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणालेय ?

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राजकीय गदारोळ झाला होता. दरम्यान, आता पुन्हा त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं आहे.

काय म्हणाले आव्हाड ?

”मला वाईट वाटतं.. न्यायव्यवस्थेत आरक्षण आरक्षण ठेवायला पाहिजे होतं.. मी बोलत नाही कारण वाद निर्माण होतो. काही काही जजमेंट अशी येतात त्यातून जातीचा वास यायला लागतो. न्याय व्यवस्था ही नॉन बायस असली पाहिजे.. अशी संविधानाची अपेक्षा आहे.”

”बाबासाहेबांना मिठी मारायची असेल तर प्रत्येक मानवाने मारली पाहिजे. संविधानाने सर्वांना समान संधी दिली आहे. मात्र न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन ८० टक्के समाजावर बाबासाहेबांनी अन्याय केला.” असं वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

मागे त्यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, असं म्हणत वाद निर्माण केला होता. त्यानंतर त्यांनी पुरावेही दिले आणि सारवासारवही केली होती. त्यांच्याच पक्षातून रोहित पवार यांनी त्यांच्या विधानाचा समाचार घेतला होता. नंतर मात्र आव्हाडांनी त्या वादावर पडदा टाकला.