JMC News: तक्रार मागे घेण्यासाठी डॉ. घोलपकडून महिलेवर दबाव

---Advertisement---

JMC News जळगाव : महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप हा तक्रार मागे घेण्यासाठी विविध मागनि दबाव टाकत आहे. तसेच मला व माझे पतीला मारण्याच्याही धमक्या एका कंत्राटदारामार्फत दिल्या जात असल्याचा खळबळजनक जबाब मनपाच्या वैद्यकीय विभागातील महिला अधिकाऱ्याने समितीकडे नोंदविला आहे. दरम्यान महिला तक्रार निवारण समितीने याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखिल महिला अधिकाऱ्याने केली आहे.


महापालिकेचा निलंबित मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप याची मनपाच्या विशाखा समितीमार्फत चौकशी सुरू आहे. या समितीने डॉ. घोलप यांच्याकडून लेखी खुलासा मागविला होता. डॉ. घोलप याने लेखी खुलासा सादर केल्यानंतर तक्रारदार महिलेचाही जबाब समिती नोंदविणार आहे. तत्पुर्वी संबंधित महिला वैद्यकीय अधिकारी यांनी डॉ. घोलप याच्याविषयी लेखी आरोप केले आहे. महिलेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, डॉ. घोलप याने त्याच्या कार्यालयातील काही सहकाऱ्यांना घरी पाठवून तक्रार मागे घेण्यास सांगितले.

तसेच विशाखा समितीच्या माजी सदस्या प्रगती चोंडकाले यांनीही हा प्रकार गैरसमजातून झाला असे लिहून देण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर बंदूक घेऊन आलेल्या एका कंत्राटदारामार्फत देखिल तक्रार मागे घेण्यास सांगितले. तसेच डॉ. घोलप याच्या पत्नीनेही घरी येऊन असाच प्रकार केला. माझे पतीच्या कार्यालयात देखिल जाऊन त्यांना धमकावण्यात आल्याचे महिला अधिकाऱ्याने तक्रारीत म्हटले आहे. समिती न्याय देणार का?

मनपाच्या वैद्यकीय अधिकारी महिलेने निलंबित असलेल्या डॉ. घोलप याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तसेच समितीतील एका माजी सदस्याकडूनही दबाव येत असल्याने मनपाची विशाखा समिती संबंधित महिलेला न्याय देणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---