नोकरी, रोजगाराचे बदलते संदर्भ!

तरुण भारत लाईव्ह । दत्तात्रय आंबुलकर। employment परंपरागत रीत्या या छोटेखानी स्वरूपाच्या पथारीवर, पण फार मोठ्या प्रमाणात पसरलेल्या व्यवसाय आणि व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर अर्थसाहाय्य मिळू लागले आहे. employment विशेषत: कोरोना व नंतरच्या काळात विशेष धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. पथारी व्यवसाय व सूक्ष्म उद्योजकांना पूरक व हितकारी होण्याच्या दृष्टीने विशेष अर्थसाहाय्य योजना सुरू करून, या क्षेत्रात विशेष पाठबळ देण्यात आले. आपल्याकडे नोकरी, रोजगार मिळणे ही संधी व न मिळणे ही समस्या. यातूनच प्रचलित वा वाढती बेरोजगारी हा नेहमीच जिव्हाळ्याचा व चर्चेचा विषय ठरतो. employment या पृष्ठभूमीवर बदलत्या संदर्भात, नोकरी, रोजगाराचे बदलते संदर्भ बघणे, पडताळून पाहणे गरजेचे ठरते. विशेषतः समाजशास्त्र व समाजशास्त्रज्ञांच्या मते, कुठल्याही कामाच्या बदल्यात मोबदला मिळणे म्हणजे संबंधित व्यक्तीला रोजगार वा स्वयंरोजगार मिळणे. employment ही संकल्पना आर्थिक-सामाजिक संदर्भात नव्याने पुढे आल्यामुळे तर त्यावर वर्तमानातील दृष्टिकोनातून समग्र विचार करणे गरजेचे ठरते.

employment वाढत्या नोकरी, रोजगाराच्या समस्येवर बोलताना ब-याचदा पकोडे बनविणे म्हणजे रोजगार नव्हे, ही बाब प्रकर्षाने व विशेषतः राजकीयसंदर्भात ब-याचदा मांडण्यात येत असली तरी चहा बनविणे, फळे वा भाजी विकणे, अगदी चौकीदार म्हणून काम करणे इत्यादींचा समावेश स्वयंरोजगाराच्या माध्यमातून नोकरी, रोजगार अशा संदर्भात केला जातो. हा मुद्दा दोन व्यक्तिगत वा राजकीय संदर्भापेक्षा सामाजिक वा आर्थिक दृष्टिकोनातून पडताळून पाहणे महत्त्वाचे आहे. employment नित्योपयोगी स्वरूपाची, संबंधितांच्या हाताला काम व पदरात दाम देणारी कामे स्वयंरोजगाराची असली तरी त्याला नोकरी वा रोजगार म्हणून स्वीकारण्याची समाजाची अद्याप मानसिकता नाही, ही वस्तुस्थिती. अशा छोटेखानी व्यवसाय, धंद्याचा परिणाम म्हणून मोठ्या संख्येत लोकांना पोटापाण्याचा मार्ग सापडतो. employment प्रसंगी त्यांना आर्थिक स्थैर्य लाभते. त्यांच्या कुटुंबाला त्याचा फायदा होतो. मात्र, या उलथापालथीला वा उलाढालीला वेगवेगळ्या पैलूंची साथसुद्धा लाभते.
परंपरागत रीत्या या छोटेखानी स्वरूपाच्या पथारीवर, पण फार मोठ्या प्रमाणात पसरलेल्या व्यवसाय आणि व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर अर्थसाहाय्य मिळू लागले आहे. विशेषत: कोरोना व नंतरच्या काळात विशेष धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. employment पथारी व्यवसाय व सूक्ष्म उद्योजकांना पूरक व हितकारी होण्याच्या दृष्टीने विशेष अर्थसाहाय्य योजना सुरू करून, या क्षेत्रात विशेष पाठबळ देण्यात आले. कुठल्याही हमीविना त्यावेळी देण्यात आलेली ती आर्थिक मदत मोठी लाभदायी ठरली. या धोरणात्मक निर्णयांचा त्यावेळी व लगेच दिसून आलेला परिणाम म्हणजे कोरोनामुळे व त्यादरम्यान विविध कारणांनी बेकार झालेल्यांना त्वरित व तात्पुरता अशा रोजगाराचा फायदा झाला. employment सूक्ष्म उद्योजक असणाऱ्या या फेरीवाला स्वरूपातील उद्योजकांना समाज आणि समाजजीवनाचा मोठा आधार मिळतो. मॉल, मोठी दुकाने व विक्रेते कितीही आले तरी जनसामान्यांसाठी आवश्यक अशा विविध स्वरूपाच्या वस्तू वा सेवा पुरविणा-यांना समाजाची साथ नेहमीच मिळते. या आर्थिक देवाण-घेवाणीतून परस्परांच्या गरजांची पूर्तता नेहमीच होते. employment या अनौपचारिक व्यवसाय क्षेत्रामुळे अनेकांना अनेक स्वरूपात फायदा होतो.
स्वयंव्यवसाय म्हणून पथारीधारक छोटेखानी व्यवसाय करणा-यांना आर्थिक प्राप्ती ब-यापैकी होते. employment त्यावर त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तर चालतोच, याशिवाय अनेक जण प्रस्थापित होतात, असे दिसून येते. ही स्थिती महानगरे व मोठ्या शहरांपासून मध्यम शहरांपर्यंत सर्वदूर दिसून येते. employment दिल्लीतील पथारीवाल्यांसाठी काम करणाèया अ‍ॅड. प्रशांत नारंग यांच्या मते, दिल्लीतील फेरीवाले वा पथारीवाल्यांची दररोजची कमाई साधारणत: २००० ते २५०० रुपये असते. या छोट्या व्यावसायिकांची मासिक सर्वसाधारण कमाई ६५ हजार रुपयांपर्यंत होऊ शकते. employment या मंडळींच्या प्राप्तीमधून खर्च वजा केला तरी त्यांना सरासरी दरमहा ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत लाभ होऊ शकतो. शहरामधील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पण त्यांच्या अपेक्षेनुरूप प्राप्ती होते. सद्यःस्थितीत खाद्यपदार्थांची प्लेट सुमारे ५० रुपयाला मिळते. employment या मंडळींनी दररोज सरासरी ५० ग्राहकांना आपले खाद्यपदार्थ विकले तरी दररोज सुमारे २५०० रुपयांचा व्यवसाय सहजपणे मिळतो. यातून त्यांचा माल-प्रक्रिया खर्च वजा करता, सुमारे १२०० ते १४०० रुपयांचा त्यांना फायदा दररोज सहजपणे मिळू शकतो.
employment शहरी भागातील फळ विक्री करणा-या छोटेखानी व्यवसाय आणि व्यावसायिकांसंदर्भात पण हीच बाब दिसून येते. मध्यम वा मोठ्या शहरांतील फळविक्रेते आठवड्याला साधारणतः ३० हजार रुपयांची फळे आणून विकतात. यातून त्यांना आठवड्यात साधारणतः १० ते १२ हजारांची प्राप्ती नफा स्वरूपात होते. employment यातून त्यांचा घरसंसार चांगल्याप्रकारे चालतो. बहुतांश जणांना आर्थिक स्थिरता प्राप्त होते. अशांची संख्या सातत्याने वाढत आहे. वर नमूद केल्याप्रमाणे काम करणारे कुणी व त्यामुळे त्यांना मिळणारा मोबदला वा रक्कम, अशांंना रोजगार करणारे नोकरदार न मानण्याकडे आपली प्रचलित मानसिकता आहे. employment मात्र, अर्थकारणाचा अभ्यास करणा-या समाजशास्त्रानुसार कुठल्याही कामातून अर्थप्राप्ती मिळविणारी व्यक्ती ही बेरोजगार नसते. अशा कामकरी लोकांच्या श्रेणीमध्ये बहुसंख्य लोक हे स्वयंरोजगार करणारे वा औैपचारिक क्षेत्रात काम करणारे असल्याने ते याबाबतीत दुर्लक्षित राहतात. employment यालाच जोड मिळते ती सरकारी क्षेत्रात नोकरी करण्याला प्राधान्य देण्याची. आपले शिक्षण पूर्ण करणारे अधिकांश जण हे स्वयंरोजगार, खाजगी क्षेत्र वा औपचारिक स्वरूपाचे काम करण्याच्या तुलनेत सरकारी नोकरीला नेहमीच प्राधान्य देतात.

 

त्यासाठी त्यांचे आग्रही व प्रसंगी प्रयत्न सुरू असतात. employment अशी नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांची वारंवार प्रयत्न करण्याची व प्रसंगी थांबण्याची तयारी असते. सरकारी क्षेत्रांतर्गत केंद्र व राज्य स्तरावर विभिन्न शासकीय विभाग, मंत्रालये, महामंडळे, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम, दूरसंचार, निमसरकारी संस्था इ.मध्ये नोकरी मिळावी, यासाठी राज्य लोकसेवा आयोग अथवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वारंवार देणारे विद्यार्थी आपण नेहमी पाहतो. employment स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यास मदत व्हावी व याद्वारे आपल्याला सरकारी नोकरीचा लाभ मिळावा, म्हणून मोठ्या रकमांसह खाजगी मार्गदर्शन केंद्रावर दरवर्षी व वाढत्या स्वरूपात येणारा विद्याथ्र्यांचा ओढा पाहिला म्हणजे आपल्याला सरकारी नोकरीचे मानसशास्त्रीय महत्त्व पटते. सरकारी क्षेत्रात एका जागेसाठी, प्रसंगी हजारो अर्जदार असल्याची बाब नवी नाही. employment यातूनच सरकारी नोकरीसाठी अत्याधिक स्पर्धा वाढते व ज्यांची निवड कुठल्या ना कुठल्या कारणाने झाली नाही, अशांची बेकारी व अस्वस्थता वाढते.
employmentपरिणामी, सामाजिक अस्वस्थता पण वाढते. याकडे एक समस्या स्वरूपातच पाहणे आवश्यक आहे. सरकारी नोकरीला एवढे महत्त्व मिळण्याचे कारण म्हणजे सरकारी क्षेत्रात काम करणा-यांना मिळणारा पगार, पगारवाढ, वेतनश्रेणी, इतर फायदे, बढतीच्या संधी व मुख्य म्हणजे कायमस्वरूपी नोकरीची शाश्वती. employment सरकारी नोकरी पक्की असते व त्यातून सहसा कुणाला काढले जात नाही, अशी ठाम धारणा! परिणामी, गेल्या काही वर्षांत उत्तर प्रदेशात संदेश वाहकांच्या ६२ जागांसाठी ९३ हजार उमेदवार होते. या उमेदवारांमध्ये ३६०० पीएच. डी., पाच लाख पदवीधर. तर २८ हजार पदव्युत्तर पात्रताधारक होते. त्याच सुमारास रेल्वेमधील नऊ लाख जागांसाठी तब्बल अडीच कोटी अर्जदारांनी प्रतिसाद दिला होता. सरकारी क्षेत्रातील उपलब्ध जागांसाठी फार मोठ्या संख्येत अर्जदारांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद व त्याचे प्रमाण म्हणजे नोकरी, रोजगाराचे बदलते संदर्भ पाहिले म्हणजे नोकरी, रोजगाराशी संबंधित प्रचलित वैयक्तिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक मुद्दे प्रकर्षाने लक्षात येतात. employment यातून युवा उमेदवारांनी वेळेत धडा घेणे, ही काळाची गरज ठरते.