सरकारी बँकेत नोकरी हवीय? या पदांसाठी सुरूय जम्बो भरती

तुम्हीही सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने भरतीची अधिसूचना जारी केली असून त्यानुसार बँकेने वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. एकूण 250 जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जातील.

यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

वयोमर्यादा
28 ते 37 वर्षे वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी वरच्या वयात सूट देण्याची तरतूद लागू आहे.

अर्ज फी
सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 600 रुपये आहे. SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांसाठी अर्जाची फी 100 रुपये आहे. परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.

परीक्षेचे तपशील
बँक ऑफ बडोदामधील वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षेत 150 प्रश्न असतील आणि कमाल 225 गुण असतील. परीक्षेचा कालावधी 150 मिनिटे आहे.

शैक्षणिक पात्रता
बँक ऑफ बडोदामधील वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी/एमबीए (मार्केटिंग आणि वित्त) किंवा समकक्ष व्यावसायिक पात्रता सर्व सेमिस्टर/वर्षांमध्ये किमान ६०% गुणांसह असणे आवश्यक आहे.