Job Requirement : सरकारी नोकरीची सुर्वण संधी ; जाणून घ्या पात्रता

---Advertisement---

 

Job Requirement : जर, तुमचे इंजिनेरींगचे शिक्षण झाले आहे आणि तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आली आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ने एक मोठी भरती जाहीर केली आहे. कंपनीने फील्ड इंजिनिअर आणि फील्ड सुपरवायझरच्या १ हजार ५४३ पदांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवार यासाठी १७ सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीत उमेदवारांना चांगले पॅकेज देखील मिळणार आहे.

भरती प्रकिया पूर्णपणे डिजिटल माध्यमातून राबविण्यात येत आहे. यात देशभरातील तरुण अर्ज करुन सहभागी होऊ शकतात. या भरतीत फील्ड इंजिनिअर आणि सुपरवायझर होण्यासाठी शैक्षणिक पात्रता ठरविण्यात आली आहे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून बीई, बीटेक किंवा बीएससी अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. किमान ५५% गुण मिळवणे आवश्यक आहे. याशिवाय, काही विशेष पात्रता देखील आवश्यक आहेत जी उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून पूर्ण करावीत. ही सर्व माहिती अधिकृत अधिसूचना आणि वेबसाइटवर दिली आहे.

फील्ड इंजिनिअर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३०,००० ते १,२०,००० रुपये पगार मिळेल. दुसरीकडे, फील्ड सुपरवायझर पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना २३,००० ते १,०५,००० रुपये पगार मिळेल. म्हणजेच, दोन्ही पदांवर चांगल्या पॅकेजसह करिअर घडवण्याची उत्तम संधी आहे.

उमेदवारांचे कमाल वय २९ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तथापि, सरकारच्या नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट देण्यात येईल. एससी/एसटी उमेदवारांना ५ वर्षांची सूट देण्यात येईल. तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात येईल. दिव्यांग उमेदवारांना १० वर्षांची सूट देण्यात येईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---