---Advertisement---

‘ऑगस्ट’च्या पहिल्याच दिवशी सरकारला मिळाली ‘गुड न्यूज’, तिजोरीत आले १.९६ लाख कोटी

---Advertisement---

---Advertisement---

July GST Collection : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारला आनंदाची बातमी मिळाली आहे. १ ऑगस्ट रोजी जुलैमधील जीएसटी संकलनाचे आकडे समोर आले आहेत. गेल्या महिन्यात सरकारला १.९६ लाख कोटी रुपये मिळाले, जे गेल्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा ७.५% जास्त आहे.

यापूर्वी एप्रिल २०२५ मध्ये जीएसटी संकलन २.३७ लाख कोटी रुपये होते, जे वार्षिक आधारावर १२.६ टक्के जास्त होते. हा सलग सातवा महिना आहे, जेव्हा जीएसटी संकलन १.८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

एप्रिल ते जुलै या काळात एकूण जीएसटी संकलन ८.१८ लाख कोटींवर पोहोचले आहे. याचा अर्थ असा की दरमहा सरासरी जीएसटी संकलन २ लाख कोटींपेक्षा जास्त आहे, जे गेल्या वर्षी १.८ लाख कोटींपेक्षा जास्त होते.

अर्थसंकल्पात, सरकारने वर्षासाठी जीएसटी महसुलात ११ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, ज्यामध्ये केंद्रीय जीएसटी आणि भरपाई उपकरासह ११.७८ लाख कोटी रुपये जमा होतील.

बातमी अपडेट होत आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---