Jungle Raj in Bihar लालूप्रसाद यादवांच्या काळात बिहार जंगल राज म्हणून ओळखले जात होते. खून, बलात्कार, दरोडे, अपहरण आणि खंडणी वसुली हा त्या काळात बिहारचा स्थायीभाव झाला होता. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावालाही उरली नव्हती. पोलिस खातेही गुन्हेगारांच्या हातचे बाहुल झाल्यासारखे वागत होते. खाकी वर्दीचा धाक उरला नव्हता.
खाकीच्या मदतीने खादीने राज्यात हैदोस सुरू केला होता. Jungle Raj in Bihar औद्योगिक आघाडीवर आनंदीआनंद होता. कोणत्याच उद्योगपतीची राज्यात उद्योग सुरू करण्याची हिंमत होत नव्हती; उलट राज्यात असलेले उद्योग बंद केले जात होते. तरुणांना रोजगार मिळत नव्हता आणि असलेल्यांचे रोजगार जात होते. राज्यात शब्दश: यादवी माजली होती. त्यामुळे सर्वच क्षेत्रात बिहार माघारला होता. परिणामी देशातील लोकांचा बिहारकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे नकारात्मक झाला होता. Jungle Raj in Bihar मध्यंतरी भाजपाच्या पाठींब्याने बिहारमध्ये नितीशकुमार यांचे सरकार स्थापन झाले आणि त्यानंतर या घटनांना आळा बसला. परिणामी राज्यात एका नव्या युगाचा प्रारंभ झाला होता. Jungle Raj in Bihar राज्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले होते. देशातील लोकांचा बिहारकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. मात्र, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ याप्रमाणे नितीशकुमार यांनी भाजपाची साथ सोडत लालूप्रसादांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली आणि बिहार आणि बिहारी जनतेचे ग्रह फिरले. Jungle Raj in Bihar राज्यात पुन्हा जंगलराज सुरू झाले.
Jungle Raj in Bihar यादवांची गुंडागर्दी पहिलेसारखी सुरू झाली. पोलिसांवरचा धाक उडाला. बिहार पोलिस राजकारण्यांचे बटिक झाले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे सोडून पोलिसांची खुलेआम गुंडागर्दी बिहारमध्ये सुरू झाली. Jungle Raj in Bihar पाटण्यात भाजपाच्या मोर्चावर पोलिसांनी जो अमानुष लाठीमार केला, त्यावरून याची खात्री पटली. पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्या एका भाजपा नेत्याचा मृत्यू झाला. याला मृत्यू म्हणणे अन्यायकारक होईल, तर नितीशकुमार सरकारने पोलिसांच्या मदतीने भाजपा नेत्याची हत्या केली, असे म्हटले पाहिजे. हो, ही हत्याच आहे! Jungle Raj in Bihar भाजपाचा शांततापूर्ण मोर्चा विधानसभेवर जात होता. या मोर्चाला कुठेही हिंसक वळण लागले नव्हते. मोर्चातील लोकांनी पोलिसांवर वा आजूबाजूच्या दुकानांवर दगडफेकही केली नव्हती. मग शांततापूर्ण अशा मोर्चावर पोलिसांनी लाठीहल्ला का केला, असा प्रश्न उद्भवतो. पोलिसांच्या या अमानुष लाठीहल्ल्यात अनेकांची डोकी फुटली, हातपाय तुटले, काही जण गंभीर जखमी झाले. Jungle Raj in Bihar जहानाबाद जिल्हा भाजपाचे महामंत्री विजयकुमार सिंह या लाठीहल्ल्यात गंभीर जखमी झाले. रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याचाच अर्थ विजयकुमार यांचा पोलिसांच्या लाठीहल्ल्यात घटनास्थळीच मृत्यू झाला. म्हणूनच हा नितीशकुमार यांच्या सरकारने पोलिसांच्या माध्यमातून केलेला खून असल्याचे आम्ही म्हटले आहे. Jungle Raj in Bihar त्यामुळे याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
नितीशकुमार यांच्या पोलिसांची ही गुंडागर्दी पाहता आपण स्वतंत्र भारतात राहतो की अजूनही इंग्रजांच्या गुलामगिरीतच आहे, असे वाटायला लागते. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांचे पोलिस दल देशाच्या स्वातंत्र्याची मागणी करणा-या लोकांवर असेच अत्याचार करीत होते. लाठीहल्ला आणि गोळीबार तर नित्याचा भाग झाला होता. त्यावेळी सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करणाèया भारतीय नागरिकांवर असाच लाठीहल्ला इंग्रज पोलिसांनी केला होता. Jungle Raj in Bihar बिहारच्या पोलिसांची वागणूक इंग्रजांच्या काळातील पोलिसांपेक्षा वेगळी दिसत नाही. जनरल डायर यांनी जालियानवाला बाग हत्याकांड घडवले; त्या इतिहासाची पुनरावृत्ती डायरी मानसिकता असलेल्या नितीशकुमार यांनी बिहारमध्ये भाजपाच्या मोर्चावर लाठीहल्ला करून केली आहे. भाजपा द्वेषाने म्हणण्यापेक्षा मोदी यांच्या द्वेषाने नितीशकुमार आंधळे झाले आहेत. Jungle Raj in Bihar त्यामुळे भाजपाच्या बळावर जवळपास चार-पाच वेळा मुख्यमंत्रिपद उपभोगणा-या नितीशकुमार यांच्या डोळ्यात आता भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते खुपू लागले आहेत. नितीशकुमार यांची राजकीय नेता म्हणून लायकी शून्य आहे. त्यांच्याजवळ कोणतेच कर्तृत्व नाही. राजकीय तडजोडी करत वा लोटांगण घालत सातव्यांदा मुख्यमंत्रिपद भूषवणा-या नितीशकुमार यांना आतापर्यंत एकदाही ५०-६० आमदारांच्या वर आपले आमदार निवडून आणता आले नाही. Jungle Raj in Bihar ४०-५० आमदारांच्या भरवशावर आतापर्यंत भाजपाच्या दयेवर त्यांनी मुख्यमंत्रिपद उपभोगले. आता लालूप्रसाद यादवांचे तळवे चाटत ते त्यांची जी-हुजुरी करीत आहेत.
नितीशकुमार यांची लायकी दहा माराव्या आणि एक मोजावी अशी आहे. ‘तुका म्हणे ऐशा नरा मोजुनी माराव्या पैजाराङ्क असे जे म्हटले होते, त्यावेळी त्यांच्या डोळ्यांसमोर नितीशकुमार असायचे कारण नाही; मात्र त्यांनी नितीशकुमार यांच्यासाठीच असे उद्गार काढले असावे, असे कोणाला वाटत असेल तर त्याला दोष देता येणार नाही. Jungle Raj in Bihar नितीशकुमार यांनी भाजपाचा एकदा नाही तर दोनदा विश्वासघात केला. सत्तेसाठी, मुख्यमंत्रिपदासाठी नितीशकुमार कोणत्याही थराला जाऊ शकतात. ज्या ताटात त्यांनी खाल्ले, त्याच ताटाला छिद्र केले. त्यांच्यासारख्या नतद्रष्ट माणसाकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाही करता येत नाही. Jungle Raj in Bihar उबाठा गटाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारण नसताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हणत आपली लायकी दाखवून दिली. मात्र, नितीशकुमार हा बिहारला लागलेला कलंक आहे, यात कोणाच्या मनात शंका नाही. Jungle Raj in Bihar भाजपाशासित राज्यात पोलिसांच्या लाठीहल्ल्यात एखाद्या दुस-या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू झाला असता, तर देशातील समस्त स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष नेते आणि त्यांचे पक्ष आतापर्यंत रस्त्यावर आले असते. आपला नवरा मेल्यासारखा आक्रोश त्यांनी सुरू केला असता. मात्र, यावेळी त्यांच्या दुर्दैवाने ही घटना भाजपाशासित राज्यात घडली नाही; त्याचप्रमाणे यात अन्यपक्षीय नेत्याचा नाही तर भाजपा नेत्याचा बळी गेला. त्यामुळे या सर्वांची दातखीळ बसली आहे. कोणाच्याच तोंडातून निषेधाचा साधा शब्द फुटत नाही. याला देशातील कोणताच पक्ष आणि कोणताच नेता अपवाद नाही.
Jungle Raj in Bihar भाजपावर टीका करताना या सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत असतो, तर भाजपेतर नेत्यावर वा त्यांच्या सरकारवर टीका करताना त्यांची बोबडी वळते. अशा सर्व ढोंगी धर्मनिरपेक्ष आणि भाजपाविरोधी नेत्यांना चाबकाने फोडून काढले पाहिजे, असे जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे ठरणार नाही. लोकशाहीच्या गप्पा करणाèया पण प्रत्यक्षात आपल्या वागणुकीने लोकशाही पायदळी तुडवणाèया मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आता पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. स्वत:ची कोणतीही लायकी आणि कर्तबगारी नसताना आपल्या पंतप्रधानपदाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा भाजपा आहे, असा समज त्यांनी करून घेतला असल्याचे दिसते आहे. Jungle Raj in Bihar त्यामुळे भाजपा नेत्यांना आपल्या मार्गातून कायमस्वरूपी हटवण्याचा नितीशकुमार यांचा प्रयत्न दिसतो आहे. भाजपा नेत्याचा मृत्यू लाठीहल्ल्यामुळे झाला नाही, असा दावा आता बिहारचे पोलिस आणि सरकारी पोपट निर्लज्जपणे करू लागले आहेत. त्यामुळे नितीशकुमार यांचे सरकार या खुनी लाठीहल्ल्याची निष्पक्ष चौकशी करणार नाही, हे उघड आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राज्याचे पोलिस महासंचालक आणि पाटण्याच्या पोलिस आयुक्तांवर आणि संबंधित दोषी अन्य अधिका-यांवर खुनाचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली पाहिजे. Jungle Raj in Bihar तसेच जनाची नाही तर मनाची लाज असेल तर नितीशकुमार यांनी राजीनामा दिला पाहिजे. बिहारमध्ये जंगल राज नाही तर जंगली नेत्यांचे राज आहे, असे म्हटले तर ते चूक ठरू नये.