Justin Trudeau : आधी आरोप नंतर टाळाटाळ; नक्की काय घडलं पहा व्हिडिओ

मुंबई : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर एका खलिस्तानी फुटीरतावादी नेत्याची हत्या केल्याचा आरोप केला आहे. मात्र, आता त्यांना याबद्दल विचारले असता त्यांनी यावर उत्तर देणे टाळले आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर खलिस्तान समर्थक दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर जस्टिन ट्रूडो हे संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असता त्यांना एका भारतीय पत्रकाराने याबद्दल प्रश्न विचारला. परंतू, त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.

जस्टिन ट्रुडो न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पोहोचले होते. दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. यावेळी पीटीआय या वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने ट्रुडो यांना त्यांच्या खोट्या आरोपांवर प्रश्न विचारला होता. मात्र, ट्रुडो पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर न देतात पुढे निघून गेले.

त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा यावर प्रश्न विचारण्यात आला, तेव्हाही त्यांनी तो टाळल्याचे दिसले. भारतीय प्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर ते सोयीस्कररित्या मौन बाळगताना दिसले. दरम्यान, ट्रुडो यांनी केलेल्या आरोपानंतर भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.