Kagisa Rabada । रबाडाने ठोकली विकेट्सची ‘ट्रिपल सेंच्युरी’, केला विश्वविक्रम

Kagisa Rabada । बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कागिसो रबाडाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद ३०० विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. कागिसो रबाडाने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसचा विक्रम मोडला आहे.

कागिसो रबाडाने 11, 817 चेंडूत 300 विकेट्स पूर्ण करण्याचा पराक्रम केला. यापूर्वी हा विक्रम वकारच्या नावावर होता, ज्याने 12, 602 चेंडू टाकून 300 विकेट्स पूर्ण केले होते. तर दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने 12,605 चेंडूत 300 विकेट्स पूर्ण केले होते. रबाडा केवळ 29 वर्षांचा असून या खेळाडूने केवळ 22.04 च्या गोलंदाजीची सरासरी आणि केवळ 39.39 च्या स्ट्राईक रेटने 300 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

आर अश्विनने घेतल्या सर्वात कमी सामन्यात ३०० विकेट्स
मात्र, कसोटी सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर सर्वात कमी सामन्यात ३०० विकेट्स घेण्याचा विक्रम आर अश्विनच्या नावावर आहे. अश्विनने अवघ्या ५४ कसोटी सामन्यांमध्ये विकेट्सचे त्रिशतक झळकावले होते.

डेनिस लिलीने 56 सामन्यांमध्ये तर मुथय्या मुरलीधरनने 58 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेसाठी डेल स्टेनने देखील 61 कसोटीत 300 विकेट्स घेण्याचा चमत्कार केला आहे.

रबाडाने आपल्या ६५व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे. मॉर्केल-ॲलनला डोनाल्डला मागे टाकण्याची संधी कागिसो रबाडाकडे आहे. मॉर्नी मॉर्केलच्या नावावर 309 कसोटी विकेट आहेत, तर डोनाल्डच्या नावावर 330 कसोटी विकेट्स आहेत.

असे म्हटले जाते की, रेकॉर्ड बनवताच ते मोडले जातात आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने ही म्हण खरी करून दाखवली आहे.

बांगलादेशविरुद्ध ढाका येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कागिसो रबाडाने दुसरी विकेट घेताच कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट्स पूर्ण केले.

मोठी गोष्ट म्हणजे या विकेटसह रबाडाने विश्वविक्रमही मोडला. कागिसो रबाडा सर्वात कमी चेंडूत 300 बळी घेणारा गोलंदाज ठरला. रबाडाने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसचा विक्रम मोडला आहे.