Kajgaon : कजगावला उघडे ट्रान्सफॉर्मर ठरताय जीवघेणे

Kajgaon :  येथील अनेक ट्रान्सफर्म नादुरुस्त व उघडे असल्याने ग्रामस्थांसाठी मोठ्या प्रमाणावर धोकेदायक ठरत आहे. अनेकवेळा गावांतील काही ट्रान्सफर्मला आग लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

 

अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर उघडे असून त्यात वीजप्रवाह चालू असतो त्यामुळे सदरील ट्रान्सफर्म अत्यंत धोकेदायक असून काही ठिकाणी जमिनीपासून दोन ते तीन फुट उंचीवर आहेत तर काही ट्रान्सफर्म अत्यंत जमीनीला लागून आहेत त्यामुळे गावातील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धोकेदायक असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.  ग्रामस्थानी अनेक वेळा मागणी करूनही  गंभीर मुद्यांकडे महावितरण कंपनी कडून दुर्लक्ष करण्यात येत आहे तसेच गावात अनेक ठिकाणी विजेच्या  तारा  अत्यंत खाली आल्या  असून धोकेदायक स्थितीत आहेत.  त्यामुळे मोठ्या वाहनांना डोकेदायक ठरत आहे .  गेल्या दोन,तीन दिवसांपूर्वी गावातील गजबजलेल्या ठिकाणीं एका मोठ्या मालवाहतूक गाडीला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने मोठ्या अपघातापासून बचावले आहेत .  मात्र अश्या घटना टाळण्यासाठी विद्युत वितरण कंपनी ने तात्काळ उपाय योजना कराव्यात अशी मागणी होत आहे

 

अनेक महिन्यापासून सबस्टेशनला अभियंता नाही

 

कजगाव सबस्टेशन ला अनेक महिन्यापासून अभियंता नाही त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते शिवाय अनेकांचे महत्वाचे कामे ही रखडली आहेत.  कजगाव सारख्या मोठ्या सबस्टेशला अनेक महिन्यापासून अभियंता नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  अनेक महिन्यापासून कुठलेही जबाबदार अधिकारी विना ओस पडलेल्या कजगाव सबस्टेशन ला तात्काळ अभियंत्यांची नियुक्ती करावी अशी मागणी  होत आहे.

 

कजगाव येथे महावितरण कंपनी कडून ग्राहकांकडे असलेल्या विजेच्या बाकीसाठी तगादा लावला जातो मात्र ग्रामस्थ विविध अडचणी सांगता तेव्हा मात्र कर्मचारी उपलब्ध नसतात त्यामुळे ह्या बेजबाबदार व वेळकाढू पणामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

 

 

गावात अनेक ट्रान्सफॉर्मर धोकेदायक व जीवघेणे झाले आहेत लवकरच उघडे ट्रान्सफर्म दुरुस्त करून त्यांना तार कंपाऊंड करण्यात यावे तसेच ज्या ठिकाणी विजेचे तारे लोंबळत आहेत त्या ठिकाणी तारे व्यवस्थित करण्यात यावे लवकच मागणी पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल

मनोज धाडीवाल,माजी सरपंच कजगाव.

 

कजगाव सबस्टेशनला अनेक महिन्यापासून आभियंता नाही त्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे ग्रामस्थाना महावितरण संबधित काही कामे असल्यास मोठी अडचण निर्माण होत असते त्यामुळे कजगाव सबस्टेशनला तात्काळ अभियंत्यांची नियुक्ती करावी

अशोक पाटील, कजगाव ग्रामस्थ